चिपळूण : चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी आकले हायस्कूलचे मुख्याध्यापक संजू वाघमारे यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून बोरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर गलांडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र हायस्कूलचे इम्तियाज इनामदार व निरबाडे हायस्कूलच्या शारदा बेंडाळे, जिल्हा प्रतिनिधी म्हणून संजय चव्हाण व अनंत साळवी, सहसचिव उदयराज कळंबे, खजिनदार मंदार सुर्वे, विद्या समिती सचिव श्रीधर जोशी, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अश्रु अस्वले, भाऊ कांबळे, संजू वाघमारे शंकर गलांडे महेंद्र शिरकर, राजेंद्र जाधव, विनायक माळी, राजेंद्रकुमार ओंबासे, धनाजी देसाई, वीणा चव्हाण, खैरदी नझरत, शबनम फरीदी, स्वप्नाली पाटील, महेंद्र साळुंके, शैलेश सुर्वे, सल्लागार म्हणून बाळासाहेब जगताप, रोहित जाधव, राम गाडवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 15/Oct/2024