राजापूर : राजापूर तालुक्यात आणखी चार आधार सेवा केंद्र मंजूर करावीत अशा आशयाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली आहे. सदरचे प्रस्ताव मंजूर होताच तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात चार ठिकाणी ही आधार सेवा केंद्र सुरू केली जातील असेही गंबरे यांनी सांगितले.
राजापूर तालुक्यात राजापूर शहरात सध्या एकच आधारकेंद्र कार्यान्वित आहे. शासनाने आधारकार्ड बाबत सक्ती केली असून आधारकार्ड वरील नाव, जन्म तारीख नोंद, पत्ता, दुरुस्ती करणे आधारकार्ड अपडेट करणे यासाठी या एकमेव केंद्रावर कायम गर्दी असते. जनतेच्या रांगा लागलेल्या असतात. याचा सारासार विचार करून शहरात तसेच ग्रामीण भागातही आणखी एक आधार केंद्राची मागणी पुढे आली आहे. याबाबत यापुर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडे चार नवीनत आधार केंद्रासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे गंबरे यांनी सांगितले. यामध्ये राजापूर शहरात एक व पाचल, नाटे व सागवे भागात तीन अशी चार नविन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 21/Jun/2025









