रत्नागिरी : रेल्वेस्टेशन येथील एका हॉटेलच्या बाजूच्या पडीक इमारतीच्या गाळ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास रेल्वेस्टेशन येथील संगम हॉटेलच्या बाजूच्या पडीक इमारतीच्या गाळ्यात निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरजोळे पोलिस पाटील यांनी कुवारबाव पोलिस ठाण्यात खबर दिली. तेथील हेड कॉन्स्टेबल गायकवाड यांनी घटनास्थळी जावून पाहिले असता अंदाजे वय ५५ चा पुरुष मृतावस्थेत दिसला. पोलिसांनी खासगी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 21-06-2025














