बेळगाव सीमावासीय मराठा भवनचे चिपळूणात भूमिपूजन

चिपळूण : बेळगाव सीमावासीय मराठी मित्र मंडळ, चिपळूण या संघटनेच्या बेळगाव सीमावासीय मराठा भवनचे भूमिपूजन पिंपळी खुर्द येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले. मंडळाच्या वतीने प्रशांत यादव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष राहुल पवार, काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या तालुकाध्यक्ष मिलन गुरव, गोविंद पाटील, रामा जाधव, कल्लाप्पा तारीहाळकर, परशुराम पाटील, नागेश हांडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भूमिपूजन कार्यक्रमानंतर बेळगाव सीमावासीय मराठी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. भविष्यात समाजोपयोगी उपक्रमांमध्ये आपण मंडळाला सहकार्य करीत राहू, असे आश्वासन यावेळी प्रशांत यादव यांनी दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 15/Oct/2024