रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथे आजाराला कंटाळून वृद्धाने घराशेजारील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.४० वा. सुमारास उघडकीस आली. अरविंद मारुती मयेकर (७०, रा. काळबादेवी फडजीवाडी, रत्नागिरी) असे विहिरीत उडी घेत आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. रविवारी पहाटे ४.३० वा. सुमारास त्यांची पत्नी अमिता मयेकर या त्यांना उठवण्यासाठी गेल्या असता त्यांना पती अरविंद मयेकर घरात कोठेही दिसले नाहीत. त्यांचा आजूबाजूला शोध घेत असताना त्यांच्या पत्नीला अंथरुणाखाली एक चिठ्ठी
सापडली.
त्यात त्यांनी मी माझ्या तोंडाच्या आजाराला कंटाळून शेजाऱ्यांच्या विहिरीत जीव देवून आत्महत्या करत असल्याचे लिहिलेले होते. त्यांच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या विहिरीत जाऊन पाहिले असता त्यांना पती अरविंद मयेकर हे विहिरीमध्ये पालथे तरंगताना दिसून आले. शेजाऱ्यांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्ररकणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 15/Oct/2024









