Todays Horoscope: आजचे राशिभविष्य; कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या..

मेष- आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. स्त्रीयांना माहेरहून काही लाभ होऊन एखादी चांगली बातमी मिळेल.

वृषभ- आज चंद्र आज वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल.

मिथुन- आज आपल्या उक्ती व कृती मुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो. कुटुंबियांशी वाद होतील.

कर्क- आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. अचानक धन प्राप्ती होईल. आर्थिक योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाण्याचे बेत आखाल.

सिंह- कामात यशस्वी व्हाल. नोकरी – व्यापार व व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावीत होतील. वडिलांकडून काही फायदा होऊ शकतो.

कन्या- आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकां कडून आनंददायी बातमी समजल्याने आपण आनंदित व्हाल. एखाद्या सहलीसाठी खर्च होईल. भावंडांकडून काही फायदा होण्याची शक्यता आहे. परदेशात जाऊ इच्छिणार्‍यांना परदेशात जाण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

तूळ- आज शक्यतो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य व वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक- रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. उत्तम भोजन व नवीन आभूषणे मिळाल्याने आपण खूप आनंदित व्हाल. व्यापार – भागीदारीत फायदा होईल.

धनु- स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी व शत्रूवर विजय मिळवाल. कार्यालयात सहकारी व हाताखालच्या व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल.

मकर- शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील. संततीच्या आरोग्य विषयक तक्रारी राहतील.

कुंभ- आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आई कडून लाभ होईल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.

मीन- आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार व खंबीर मन ह्यामुळे कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांसह प्रवास – पर्यटन होऊ शकेल. भावंडांशी जवळीक वाढेल. सामाजिक मान- सन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 23-06-2025