रत्नागिरी : झाडाच्या फांद्या तोडताना शॉक लागून तोणदे येथील तरुण जखमी

रत्नागिरी : तालुक्यातील तोणदे येथे झाडाच्या फांद्या तोडत असताना बाजूने जाणाऱ्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून तरुण झाडावरुन पडून जखमी झाला. ही घटना रविवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. सुमारास घडली. संदेश दिवाकर पाटील (३६, रा. तोणदे, रत्नागिरी) असे शॉक लागून जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी तो घराशेजारील झाडावर चढून फांद्या तोडत होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून त्या धक्क्याने तो खाली पडला. यात त्याला दुखापत झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत तेथील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 15/Oct/2024