रत्नागिरी : पाणी समजून अज्ञात द्रव प्राशन केलेला खलाशी रुग्णालयात दाखल

रत्नागिरी : समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बोटीवरील खलाशाने पाणी समजून प्राशन केलेल्या अज्ञात द्रवामुळे त्याच्या घशाला त्रास जाणवू लागला. त्याला उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही घटना सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. राजकुमार रामबहाद्दूर डंगोरा (मूळ रा. नेपाळ सध्या रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) राजकुमार डंगोरा हा रविवारी मिरकरवाडा येथील बोटीवरुन समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेला होता. रविवारी रात्री तो बोटीवर झोपलेला असताना मध्यरात्री त्याला तहान लागल्याने त्याने बोटीवरील बाटलीत असलेले द्रव पाणी समजून प्राशन केले.

काही वेळाने त्याच्या घशाचा त्रास जाणवू लागल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी बोटी मिरकरवाडा बंदरात आणून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 15/Oct/2024