रत्नागिरी : अकराव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रत्नागिरीत पतंजली योग समिती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने योगशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सहभागी झालेल्या नागरिकांनी या वेळी योगप्रात्यक्षिके केली. विद्यार्थ्यांनीही सूर्यनमस्कार आणि योगप्रात्यक्षिके सादर केली. ‘योग, आयुर्वेद आणि जीवनशैली’ या विषयावर आयुर्वेदाचार्य विवेक इनामदार यांचे भाषण झाले.या कार्यक्रमाला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गोसावी, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी ॲड. विद्यानंद जोग यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.योग ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेली अमूल्य देणगी आहे. या भारतीय प्राचीन परंपरेचा व संस्कृतीचा सर्व देशांमध्ये प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी अनेक भारतीयांनी कार्य केले. त्यामध्ये योगऋषी प. पू. रामदेवजी महाराजांचे नाव अग्रभागी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे २१ जून हा दिवस दरवर्षी सर्व देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 23-06-2025









