राजापूर : नारकर वाचनालयात आज वाचन प्रेरणा दिन

राजापूर : कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचलमार्फत मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ग्रंथालयात १५ व १६ ऑक्टोबर ला रोजी विविध विषयावरील पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थी, वाचक, सभासद, हितचिंतक, पुस्तकप्रेमींनी आवर्जून उपस्थित रहावे व वाचनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नारकर वाचनालयाचे अध्यक्ष किशोर नारकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 15/Oct/2024