रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील वायंगणी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळेत माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेतील मुलांना आणि अंगणवाडीतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
वायंगणी गावातील माजी विद्यार्थी अमित उबारे (शिवसेना उपशाखा प्रमुख, वायंगणी), नरेश पावसकर (माजी गोळप ग्रामपंचायत सदस्य), शैलेश शिंदे, प्रतिक भोवड, संतोष पावसकर, निखिल शिंदे, प्रवीण घाणेकर, अक्षय शेडगे, आणि प्रवीण भोवड यांनी पुढाकार घेतला. शाळेतील मुलांच्या गरजा ओळखून त्यांनी विद्यार्थ्यांना वह्या, चित्रकलेचे साहित्य आणि अन्य शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले.
या माजी विद्यार्थ्यांनी केवळ शाळेतील विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न राहता, गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही चित्रकला वह्या आणि इतर साहित्य भेट दिले. माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील मुलांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छाही दिल्या.
या कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माळी मॅडम, उपशिक्षिका सौ. आदिती सावंत, अंगणवाडीताई सौ. लिंगायत मॅडम, मदतनीस श्रीमती घवाळी मॅडम आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे शाळेतील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी आणखी वाढण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 23-06-2025














