खेड : तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात सोमवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तासभर पडलेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली.
खेड मोहाने मार्गावरील ऐनवली येथे दुचाकीस्वाराच्या डोक्यात झाडाची फांदी पडल्याने तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. स्वप्नील किसन पवार (रा. कांदोशी) असे त्या जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 15-10-2024