रत्नागिरी : ‘गोगटे जोगळेकर’चा महिला कबड्डी संघ उपविजेता

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी च्या महिला कबड्डी संघाने मुंबई विद्यापीठ कोंकण झोन महिला कबड्डी स्पर्धेचे उपविजेतपद पटकावले. मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि टी. बी. के खेड आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ते ८ ऑक्टोबर रोजी कोकण झोन महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोगटे जोगळेकर संघात सानिका मांडवकर, नंदिनी कोचरे, बिशना थापा, हार्दिका सुर्वे, आकांक्षा भातडे, दीक्षा मोहिते, सानिका शेख, अनिष्का गुरव, अमिता गावडे, भार्वी साळवी, मृण्मयी कदम या विद्यार्थ्यांनीनी महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 15/Oct/2024