मुंबई : Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.
योजना सुरु केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केले जायचे. या योजनेद्वारे आतापर्यंत लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. आता जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळतात याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडून जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ( Ladki Bahin Yojana )
लाडक्या बहिणींना 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा ( Ladki Bahin Yojana )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 11 महिन्यांचे 1500 रुपयांप्रमाणं 16500 रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार एका वर्षात डीबीटी द्वारे लाडक्या बहिणींना किंवा लाभार्थ्यांना 18000 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी म्हणजेच जुलै 2024 पासून ही योजना सुरु केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाचवेळी लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलं होतं. आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झालं असून लाडक्या बहिणींना या महिन्याच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा आहे.
या लाडक्या बहिणींना मिळतात 500 रुपये ( Ladki Bahin Yojana )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली. या योजनेच्या सुरुवातीच्या शासन निर्णयातील अटींनुसार महाराष्ट्र सरकारचं डीबीटीद्वारे एखाद्या व्यक्तीला कमाल 18000 रुपये देण्याचं धोरण आहे. ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांना केंद्राचे 6000 रुपये आणि राज्याच्या योजनेचे 6000 रुपये म्हणजेच 12000 रुपये मिळतात. त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपये दिले जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अशा लाभार्थी महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या यापूर्वी जाहीर करण्यात आलेली असून ती 774148 इतकी आहे.
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ( Ladki Bahin Yojana )
महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळं मोठा फायदा झाला. महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं, त्याची पूर्तता कधी होणार याकडे देखील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 23-06-2025














