रत्नागिरी : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आंतरवासिता उपक्रम उपलब्ध करणार

रत्नागिरी : शासकीय कार्यालयांनी विद्यार्थ्यांना आंतरवासिता उपक्रम उपलब्ध करून देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत मार्गदर्शक सूचनांचा मसुदा तयार करण्यात आला आहे. त्यावर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, विधी व न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, मुख्य निवडणूक अधिकारी, कृषी विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग, महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून पथदर्शी स्वरूपात अभिप्राय मागविण्यात आले होते. आता या मसुद्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आंतरवासिता उपक्रम लागू करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 15/Oct/2024