राजापूर हायस्कूल आणि गोडे-दाते कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती!

राजापूर, ता. २३: राजापूर येथील राजापूर हायस्कूल आणि गोडे-दाते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३० जून २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन संस्थाचालकांनी केले आहे.

शिक्षकांच्या रिक्त जागांचा तपशील:

अ.क्र.माध्यमपदअनुदान प्रकारवर्गविषयशैक्षणिक पात्रतासंख्याअनुशेष
०१मराठीसहाय्यक शिक्षक४० टक्के टप्पा११वी व १२वीइंग्रजीएम.ए. बी.एड. (द्वितीय श्रेणी)०१अनु.जाती-३ (पैकी महिला राखीव- १), ईडब्ल्यूएस-१, एसईबीसी-१
०२मराठीसहाय्यक शिक्षक२० टक्के टप्पा११वी व १२वीअर्थशास्त्रएम.ए. बी.एड. (द्वितीय श्रेणी)०१अनु.जाती-३ (पैकी महिला राखीव- १), ईडब्ल्यूएस-१, एसईबीसी-१
०३मराठीशिक्षणसेवक१०० टक्के९वी ते १०वीहिंदीबी.ए. बी.एड.०१अनु.जाती-३ (पैकी महिला राखीव- १), ईडब्ल्यूएस-१, एसईबीसी-१

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा:

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक अर्हतापदसंख्याअनुदान प्रकारअनुशेष
०१कनिष्ठ लिपिकएच.एस.सी./पदवीधर, मराठी व इंग्रजी टायपिंग, एम.एस.सी.आय.टी.०११०० टक्के अनुदानितएस.ई.बी.सी., ईडब्ल्यूएस, खुला, अनु.जाती, अनु.जमाती, विजाअ
०२पूर्णवेळ ग्रंथपालएच.एस.सी./पदवीधर, बी.लिब./एम.लिब. प्रमाणपत्र धारक०११०० टक्के अनुदानितएस.ई.बी.सी., ईडब्ल्यूएस, खुला, अनु.जाती, अनु.जमाती, विजाअ
०३पूर्णवेळ प्रयोगशाळा सहाय्यकएच.एस.सी./पदवीधर०१४० टक्के टप्पाएस.ई.बी.सी., ईडब्ल्यूएस, खुला, अनु.जाती, अनु.जमाती, विजाअ

अर्जाची अंतिम मुदत आणि मुलाखतीची माहिती:

  • इच्छुक उमेदवारांनी ३० जून २०२५ पर्यंत स्वहस्ताक्षरातील अर्ज राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत स्वहस्ते किंवा टपालाने पोहोच करावेत.
  • मुलाखतीला येताना उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या मूळ आणि सत्यप्रती सोबत आणणे अनिवार्य आहे.
  • मागासवर्गीय उमेदवारांनी मुलाखतीला जातीचा व जातपडताळणीचा मूळ दाखला आणि सत्यप्रती आणणे आवश्यक आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा मा. शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. रत्नागिरी यांच्या मंजुरीच्या आधारावर भरण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी राजापूर हायस्कूल आणि गोडे-दाते कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, राजापूर येथे संपर्क साधावा.