Rashi Bhavishya: आज ‘या’ राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक

मेष- आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. बाहेरचे खाणे – पिणे टाळणे हितावह राहील. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकार्यांचे सहकार्य लाभेल.

वृषभ- शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज उत्साह व चौकसवृत्ती ह्यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. कामात सहजपणे एकाग्रचित्त होऊ शकेल. धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे करू शकाल.

मिथुन- आज आपणास आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडे लक्ष द्यावे लागेल.

कर्क- आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी – व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल.

सिंह- कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे टाळा.

कन्या- आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल.

तूळ- आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्या मुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहणे हिताचे राहील.

वृश्चिक- आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

धनु- आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर व सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता व यश मिळेल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. मैत्रीणींची भेट होईल.

मकर- आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. त्यांच्या भेटी रोमांचक ठरतील. शेअर – सट्टा यात लाभ होईल. संततीच्या समस्या मिटतील. मित्रांकडून लाभ होईल.

कुंभ- आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य – प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल. स्वभावात हट्टीपणा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे.

मीन- आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. मित्रांसह लहानसा प्रवास कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 24-06-2025