चिपळूण : तालुक्यातील कोंडफणसवणे वाशिष्ठी नदीवरील पुलाखाली एकाचा मृतदेह सापडला आहे. संतोष बाबू येडगे (४०, रा. ऐनाचे तळे पोफळी) असे मृताचे नाव आहे. ही घटना दि. १२ ऑक्टोबर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली तर शिरगाव पोलिस ठाण्यात दि. १३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. कोंडफणसवणे येथील वाशिष्ठी नदीच्या पुलाखाली एक व्यक्ती झोपलेला दिसून आला. त्यामुळे काही लोकांनी या पुलाखाली जवळ जाऊन पाहिले असता तो मृत स्थितीत आढळला. अधिक तपास शिरगाव पोलिस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 15/Oct/2024









