लांजा, ता. २४ जून, २०२५: लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक, गरववाडी येथे पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता करण्यात आली.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक नितेश नवनाथ राणे (पोकॉ/१५७७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दीपक सीताराम डोळस (वय ५८, रा. वेरवली बुद्रुक, डोळसवाडी, ता. लांजा) या आरोपीने बेकायदेशीरपणे आणि परवान्याविना गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने ती आपल्या ताब्यात बाळगली होती.
पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे १०० रुपये किमतीची ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. आरोपी दीपक डोळस याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, लांजा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 24-06-2025














