दापोली : श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूलमध्ये हादगा-भोंडला स्पर्धा

दापोली : श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्यु. कॉलेज गावतळे येथे नवरात्रौत्सवनिमित्त हादगा भोंडला स्पर्धा, दांडिया रास व तसेच ‘बोलकी शाळा माऊली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हल्लीच्या शहरीकरण व धावपळीच्या युगात अनेक मौल्यवान अशा परंपरा लुप्त होत चालल्या आहेत. त्यातीलच हादगा एक आहे. याबाबत सविस्तर माहिती तसेच अशा परंपरेंचे जतन करणे का गरजेचे आहे, याबाबत प्राचार्य भक्ती सावंत यांनी उपस्थितांना माहिती दिली. भोंडला स्पर्धेत लहान गटात प्रथम आयुष गुरव ग्रुप, द्वितीय मंथन मोरे ग्रुप, तृतीय ओवी मळेकर ग्रुप, मोठा गटात प्रथम निशा गोरीवले ग्रुप, द्वितीय स्वरीत घरटकर ग्रुप, तृतीय सिद्धी बालगुडे ग्रुप तसेच बोलकी शाळा माऊली स्पर्धेत प्रथम सहावी वर्ग, द्वितीय दहावी वर्ग, तृतीय आठवी वर्गाने यश मिळवले. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 15/Oct/2024