दापोली : दापोलीत मे महिन्यात पडलेल्या पावसाने जागोजागी धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांची पावले या धबधब्यांकडे वळत आहेत. निसर्गरम्य अशा डोंगरावरून कोसळत असलेला बांधतिवरे धबधबा आकर्षण ठरत आहे, तर बांधतिवरे या मुख्य मार्गावर प्रवाहित झालेला हा घवघवा पावसाळी पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सभोवतातील गर्द झाडी, उंच डोंगर आणि खळखळून वाहणारी बांधतिवरे नदी पावसाळी पर्यटनाचे केंद्र बनले आहे. तर पावसाने उसंत घेतल्याने पर्यटकांचा ओघ या धबधब्याकडे वाढत आहे. दापोली तालुक्याला समुद्र किनाऱ्याचे देणं आहे. त्यामुळे दापोलीची ओळख ही पर्यटन तालुका अशी बनली आहे. इथले पावसाळी पर्यटन देखील पर्यटकांना वेड लावते. त्यामुळे दापोलीत खास पावसाळी
पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी असते.
अनेकदा इथल्या पर्यटनाला ‘स्वित्झर्लंड’ अशी देखील उपमा दिली जाते. बांधतिवरे येथील नदीवर पाणीयोजनेच्या जॅकवेलजवळच्या परिसरातच हे दोन ते तीन धबधबे आहेत. दापोली शहरातून अवघ्या ५-६ कि.मी. अंतरावर हे धबधबे आहेत. दापोली-सारंग, दापोली- ताडील या एस.टी. बसेसने या ठिकाणी जाता येते. मात्र, या ठिकाणी जाण्यास खासगी वाहन घेऊन जाणे अधिक उपयुक्त ठरते. दापोली शहरातून अवघ्या ५ ते ६ कि. मी. अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी रिक्षानेही जाता येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 24/Jun/2025














