संगमेश्वर : कळंबुशी परिसरात तारेच्या कुंपणाचा विद्युत शॉक बसून दोन गुरांचा मृत्यू

आरवली : कळंबुशी परिसरात शेतात कुंपण करून तारेत वीज प्रवाह सोडला असल्याने विजेच्या झटक्याने दोन गुरांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी परिसरात शेतात कुंपण करुन तारेत विद्युत प्रवाह सोडला होता. यावेळी कोणतीही काळजी घेतली गेली नाही, शिवाय एखादा व्यक्तीही त्या ठिकाणी ठेवला गेला नाही. त्यामुळे, विजेचा धक्का लागून गुरांचा मृत्यू झाला. काही दिवसांनी भात कापणी आदी शेतीचा हंगाम सुरू होणार आहे. असे असताना काहींकडून शेतीच्या भोवती वीज प्रवाह सोडून ठेवण्यात येत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांत भीती व चिंतेचे वातावरण आहे. बेकायदा आणि प्राण्यांचा मृत्यू व्हावा, या उद्देशाने वीज प्रवाह सोडून ठेवण्यात येत असल्याने संबंधित प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 15/Oct/2024