दापोली : जालगाव ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विकासकामांसाठी निधी मंजूर केला जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री जालगाव योगेश येथील कदम यांनी भेटीदरम्यान दिली.
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत राणी लक्ष्मीबाई महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा जालगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडली. या कार्यक्रमाला राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
राज्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर जालगाव दौऱ्यात मंत्री कदम यांचा जालगावचे सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देण्याची विनंतीही करण्यात आली होती. त्यानुसार मंत्री योगेश कदम यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
यावेळी सरपंच अक्षय फाटक यांनी चर्चेद्वारे गावाच्या विकासकामांची माहिती दिली देऊन गावाच्या विकासासाठी सादर केलेल्या प्रस्तावांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यावर मंत्री योगेश कदम यांनी गावाच्या विकासकामांसाठी निश्चित निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 24/Jun/2025














