रत्नागिरी : आयटीआयमधील प्रवेशासाठी २६ जूनपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. या प्रवेशाला दि. २६ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे एक वर्ष कालावधीचे तर काही दोन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम आहेत.

वायरमन, वेल्डर, सुईग टेक्नॉलॉजी, वुडवर्क टेक्निशियन या अभ्यासक्रमासाठी दहावी पास/नापास अशी शैक्षणिक पात्रता असून, अन्य अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण पात्रता आहे. दि. १५ मेपासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन प्रवेश निश्चित करावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 24/Jun/2025