श्रृंगारतळी : ‘वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन अभिनेता ओंकार भोजने यांनी केले. शिवतेज फाउंडेशन, नाटक कंपनी-चिपळूण व जानवले ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जानवले जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात सिने-नाट्य अभिनेते ओंकार भोजने यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिसरात विविध वृक्षांचे रोप लावून झाली. त्यानंतर शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संकेत साळवी यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी शेखर भिलारे म्हणाले की, ओंकार भोजने यांनी फक्त कलाक्षेत्रात नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत आजच्या पिढीला चांगला संदेश दिला आहे, असे सांगितले.
या कार्यक्रमाला जानवले सरपंच जान्हवी विखारे, चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले, गुहागरचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, मुख्याध्यापक कैलास शार्दुल, उपसरपंच वैभवी जानवलकर, कृषी अधिकारी धायगुडे, ग्रामसेवक जी. बी. सोनवणे, शिवतेज फाउंडेशनचे गणेश धनावडे, राजेंद्र आरेकर, विकास मालप, मनसेचे उपजिल्हाप्रमुख विनोद जानवलकर, अजय खाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन कोंडविलकर, मुबीन ठाकूर, मंगेश कोंडविलकर, विभावरी लांजेकर, गजेंद्र पौनीकर, संदीप कोंडविलकर, राजेंद्र आरेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश गोयथळे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 24/Jun/2025














