Sharad Pawar : सरकारी पदावर असताना मी कधीही सहकारी संस्थाची निवडणूक लढवली नाही; शरद पवारांचा अजित पवारांना टोला

Malegaon Sakhar Karkhana Election Result : माळेगाव साखर कारखाना निवडणुकीवरून शरद पवारांनी अजित पवारांनी टीका केली आहे. सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये, मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही असं शरद पवार म्हणाले.

ते बारामतीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्ता मारत होते.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला घवघवीत यश मिळाल्याचं दिसून येतंय. त्याचवेळी शरद पवारांनी त्यांच्यावर नाव न घेता टीका केल्याचं दिसून आलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः कारखान्याच्या निवडणुकीत उभे आहेत.

Sharad Pawar On Malegaon Factory Result : विरोधकांना न्याय कसा देणार?

आपण आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत, सरकारी पदावर असताना सहकारी संस्थांची निवडणूक निवडणूक लढवली नाही. विरोधकांना काही अडचण आली तर सरकारी पदावरील व्यक्ती जो कारखान्याचा प्रमुख असेल, तर तो विरोधकांना न्याय कसा देईल? असं शरद पवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:31 24-06-2025