खेड : कोकण मार्गावर धावणाऱ्या मडगांव-बांद्रा एक्सप्रेसला खेड येथील स्थानकात थांबा देण्याबाबत सातत्याने पत्रव्यवहार करूनदेखील रेल्वे प्रासनाने प्रतिसाद दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेने रेल्वे बोर्डाला पुन्हा निवेदन सादर करत थांबा देण्याबाबत विचार करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. मडगांव-बांद्रा एक्सप्रेस सुरू करताना कोकण भागाला थेट मुंबईच्या पश्चिम उपनगरांशी विशेषतः वसई, भाईंदर, बोरीवली, अंधेरी, बांद्रा टर्मिनसशी जोडण्याचा उद्देश होता.
मात्र मर्यादित थांबे आणि स्थानिक प्रवाशांचा विचार न केल्यामुळेच एक्सप्रेसला अत्यल्प गर्दी दिसून येत आहे. येथील रेल्वेस्थानक हे तालुक्यापुरतेच मर्यादित नाही तर दापोली, माणगांव, पोलादपूर आणि सीमा राज्यातील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील गावांसाठी महत्वाचा केंद्रबिंदू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:53 PM 24/Jun/2025














