भारतीय संघातील युवा क्रिकेटर तिलक वर्मा (Tilak Varma) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी इंग्लंडमधील काउंटी चॅम्पियनशिप (County Championship) स्पर्धेत अगदी धमाक्यात पदार्पण करून लक्षवेधून घेतले आहे.
हॅम्पशायरकडून एसेक्स विरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माने इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतकी डाव साधला आहे. याशिवाय ईशान किशन यानेही या स्पर्धेत खास छाप सोडली आहे.
तिलक वर्माचा पदार्पणात धमाका; इंग्लंडच्या मैदानात ठोकलं प्रथम श्रेणीतील सहावे शतक
२२ वर्षीय तिलक वर्मानं छोट्या फॉर्मेटमध्ये अर्थात टी-२० क्रिकेटमध्ये मोठा धमाका करुन दाखवला आहे. आता इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये तो रेड बॉल क्रिकटमध्ये आपली भात्यातील धमक दाखवून दिलीये. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिलक वर्मानं २३९ चेंडूत प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सहावे शतक साजरे केले. दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर सायमन हार्मरने याने त्याची विकेट घेतली. इशान किशन याने २४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी केली.
क्रिकेटच्या सर्व प्रकारात सर्वोत्तम देण्यास तयार असल्याची झलक
हॅम्पशायर संघाने ३४ धावांवर २ विकेट्स गमावल्यावर तिलक वर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. संघ अडचणीत असताना दबावात त्याने मैदानात तग धरून खेळताना २३९ धावांत शतक पूर्ण केले. टी-२० क्रिकेटनंतर मोठ्या फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठीही तयार असल्याचे संकेतच या भारतीय युवा क्रिकेटरनं इंग्लंडमधील आपल्या क्लास इनिंगमधून दिले आहेत.
ईशान किशनचंही दमदार पदार्पण
भारतीय विकेटकीपर-बॅटर ईशान किशन (Ishan Kishan) याने नॉटिंघमशायर संघाकडून काउंटी क्रिकेटमध्ये (County Championship) धमाकेदार पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. त्याने पदार्पणाच्या सामन्यात १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने त्याने ८७ धावांची खेळी केली. त्यालाही शतकी खेळीची संधी होती. पण डॉम बेसनं त्याची विकेट घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:46 24-06-2025














