रत्नागिरी : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्या वतीने रत्नागिरीत वैश्य भवन उभारणीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी ‘वैश्य भवन निर्माण समिती’ची स्थापना करण्यात आली असून, एमआयडीसी येथे सुसज्ज वैश्य भवन उभारण्यात येणार आहे.
या नवीन समितीच्या अध्यक्षपदी सौरभ मलुष्टे यांची निवड करण्यात आली आहे, तर हेमंत वणजू उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. सचिवपदी दिनार भिंगार्डे, खजिनदारपदी दिनेश जठार यांची निवड झाली आहे. तसेच, वीरेंद्र वणजु, सिद्धार्थ बेंडके आणि सुनील बेंडखळे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून एमआयडीसी येथे वैश्य भवन उभारणीसाठी ३ गुंठे जागा उपलब्ध झाली आहे. या जागेत एक सुसज्ज सभागृह आणि वैश्य समाजातील मुलांसाठी वसतिगृह उभारण्याचे नियोजन आहे. रत्नागिरी हे आता एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले असल्याने, येथे उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या वैश्य समाजातील विद्यार्थ्यांना नाममात्र दरात राहण्याची व्यवस्था मिळावी, हा वैश्य भवन उभारणीमागील मुख्य उद्देश आहे.
या महत्त्वपूर्ण कार्यासाठी वैश्य समाजातील सर्व बांधवांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन ‘वैश्य भवन निर्माण समिती’ने केले आहे. या योगदानातून वैश्य समाजाच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 25-06-2025














