देवरुख : संगमेश्वर-वाशी रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या आतच हा रस्ता खराब होऊ लागला आहे. विशेषतः गोपाळवाडी परिसरातील मोरीवर निर्माण झालेला खोल खड्डा अपघातास आमंत्रण देणार आहे. या मोरीवर दोन्ही बाजूंनी रस्ता खचल्यामुळे मोठा खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा इतका खोल आहे की, रात्रीच्यावेळी गाडी त्यात गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालकांसाठी हे ठिकाण अतिशय धोकादायक ठरत असून, अनेकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही दुरुस्ती झाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर या खड्ड्यामुळे अपघातांचा धोका अधिकच वाढला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे आणि मोरीच्या बाजूची योग्य दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 25/Jun/2025














