चिपळूण : शहरातील कोल्हेखाजण येथे भीषण अपघातात वीजवाहक तार कोसळल्यामुळे पाच दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून, एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेतकरी गीत प्रमोद पांडुरंग कदम यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद कदम यांच्या मालकीच्या म्हशी नेहमीप्रमाणे कोल्हेखाजण परिसरातील मोकळ्या जागेत चरण्यासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान, महावितरणच्या विद्युतवाहक तारा अचानक कोसळल्याने पाच म्हशी जागीच मृत्युमुखी पडल्या, तर एक म्हैस दोन्ही पार्यानी अपंग झाली असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत निष्काळजीपणाबाबत नाराजी व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 25/Jun/2025














