संपर्क युनिक फाउंडेशनच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी जमीर खलफे

रत्नागिरी : गेल्या सात वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या संपर्क युनिक फाउंडेशनच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार व मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते जमीर खलफे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. जमीर खलफे गेल्या सात वर्षांपासून संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांसाठी कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत सभासदांनी त्यांना जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.

निवडीनंतर खलफे यांनी सांगितले की, सभासदांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. मला सोपवलेली जबाबदारी मी सर्वांच्या सहकार्याने निश्चितच पार पाडेन. आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य यापुढेही निरंतर सुरू ठेवेन.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, सल्लागार सुहेल मुकादम, सचिव युसुफ शिरगावकर, खजिनदार सयीद मुल्ला यांच्यासह उपस्थित सभासदांनी जमीर खलफे यांना शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 25-06-2025