देवरुख : शहरातील आठल्ये सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व महिला विकास कक्ष विभागाच्या वतीने शारदोस्तवानिमित्ताने आणि सरस्वती पूजनाच्या औचित्य साधून पानाफुलांची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये २१ स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कलाकृतींचे सादरीकरण केले.
या स्पर्धेचे परीक्षण महाविद्यालयाचा गुणी विद्यार्थी व राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवातील यशस्वी चित्रकार सुयोग रहाटे यांच्यासह प्रा. धनंजय दळवी आणि प्रा. देवयानी जोशी यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक चैत्राली खामकर (१२वी वाणिज्य), द्वितीय क्रमांक (विभागून) चिन्मयी वणकुंद्रे व दिया मुंडेकर (१२वी वाणिज्य-ब), पूर्वा वेद्रे व प्राची जाधव (११वी- संयुक्त), तृतीय क्रमांक (विभागून) ममता मुंडेकर व चंदना मुंडेकर (११वी बँकिंग), अथर्व कदम व साई मांजरेकर (१२वी कला) यांनी मिळवला.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. सानिका भालेकर, प्रा. सीमा शेट्ये उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रा. संचिता चाळके यांनी मेहनत घेतली. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, अॅड. वेदा प्रभुदेसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 15/Oct/2024









