रत्नागिरी : बीएसएनएल नेटवर्क संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक

रत्नागिरी : लांजा, राजापूर तालुक्यातील भारत दुरसंचार निगम लि. च्या (बीएसएनएल) नेटवर्कचा प्रश्न काही सुटता सुटेना. ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन काल आमदार किरण सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. परंतु बीएसएनएल कंपनीचे अधिकारी वगळता अन्य अधिकारी उपस्थित नसल्याने बुधवारी (ता. २५) पुन्हा बैठक घेण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या.

बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन बीएसएनएलच्या समस्या तत्काळ दूर करा, असे ते. सामंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

लांजा, राजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या आहे. नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. कोणाशीही संपर्क साधता येत नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याबाबतच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन काल जिल्हाधिकारी यांच्या समवेत आमदार सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीत फक्त बीएसएनएल अधिकारी उपस्थित होते. इतर कंपन्यांचे अधिकारी न आल्यामुळे आज पुन्हा बैठक होणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 25/Jun/2025