लांजा शहरात बेशिस्त पार्किंगवर होणार दंडात्मक कारवाई

लांजा : लांजा शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीला अडथळा होईल, अशा प्रकारे वाहन आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी दिली.

शहरातील रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत बगळे म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे शहरातील काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करायची आहे; परंतु काही वाहनचालक वाहन धोकादायक स्थितीत रस्त्यावर लावतात, वाहतुकीला अडथळा होईल अशा रितीने वाहन थांबवतात. नो पार्किंगमध्ये वाहन लावणे किंवा सर्व्हिस रोडवर वाहने उभी करून निघून जाणे, असे प्रकार सुरू असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे यापुढे वाहतुकीस अडथळा होईल, अशी वाहने उभी करून ठेवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 25/Jun/2025