रत्नागिरी : जिल्ह्याबाबत एक मोठी दिलासादायक बाब म्हणजे जूनच्या मध्यावरच जिल्ह्यातील ६८ धरणांपैकी २९ धरणे १०० टक्के भरली आहे. २८ धरणे ५० टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. सर्व धरणांमध्ये ३०५.५३ दलघमी पाणीसाठा झाला असून, हे प्रमाण ६८.४८ टक्के एवढे आहे.
अजून जुलै बाकी असल्याने यंदा सर्व धरणातील पाणीसाठा समाधानकारक होणार हे निश्चित आहे. जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या तीन मध्यम प्रकल्पांसह ६८ लघुपाटबंधारे धरण आहेत. दरवर्षी मे महिन्यामध्ये तीव्र उष्म्याने धरणांमधील पाण्याचे बाष्प होऊन मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यांमध्ये घट होते. पाणीटंचाईचे मोठे संकट जिल्ह्यावर येते. त्यामुळे धरणातील पाणीवापरावर काही बंधने येतात; परंतु यंदा वेगळीच परिस्थिती निर्माण झाली. मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. हा पाऊस सलग आठ ते पंधरा दिवस राहिल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईची ओढ कमी झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:02 PM 25/Jun/2025














