चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली, मारळ, बामणोली, खडीकोळवण, ओझरेखुर्द, कासारकोळवण, निवेखुर्द, मुरादपूर, हातीव या गावांतील १६० हून अधिक लोकांनी जिल्हाधिकारी आणि आमदार शेखर निकम यांना दोन महिन्यांपूर्वी निवेदन देत भूसंपादन करूनच रस्ता करावा. तोपर्यंत या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. या प्रश्नी भूसंपादनाचा निर्णय न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांसह १५ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती अशोक अणेराव यांनी दिली.
जमीन ताब्यात नसताना सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची निविदा काढण्यात आली. भूसंपादनाची मागणी करूनही भूसंपादन न करताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता काँक्रिटीकरण करण्याची तयारी सुरू आहे. अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे नियोजन आहे; मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेचे भूसंपादन केलेले नाही. जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनीत काम सुरू केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी शरद पवार आणि अशोक अणेराव यांनी प्रशासनाला दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 25/Jun/2025














