बॉलिवूडमध्ये कपूर घराणं मोठं आहे. या घराण्यातील दोन बहिणी करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांनी इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. दोघींनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले.
करिश्माला ‘लोलो’ तर करीनाला ‘बेबो’ अशी ओळख मिळाली. दोघी बहिणी कायम एकमेकींची साथ देताना दिसतात. कठीण प्रसंगीही एकमेकींच्या मागे खंबीरपणे उभ्या असतात. आज करिश्मा कपूरचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने करीनाने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
करीना कपूरने करिश्मा आणि सैफ अली खानचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबत ती लिहिते, “तुम्हा दोघांचा हा फोटो माझ्या सर्वात आवडीचा आहे. ही पोस्ट जगातील सर्वात स्ट्राँग आणि बेस्ट मुलीसाठी आहे. आपल्यासाठी हे वर्ष खूप कठीण होतं. पण ते म्हणतात ना कठीण गोष्टी फार काळ टिकत नाहीत…पण बहिणींमधला बॉन्ड कायम असतो. माझी बहीण, माझी आई, माझी बेस्ट फ्रेंड…वाढदिवसाच्या शुभेच्छा लोलो.”
हे वर्ष फार कठीण होतं असं करीनाने पोस्टमध्ये लिहिलं आहे. याला कारणंही तशीच आहे. काही दिवसांपूर्वीच करिश्माचा पूर्व पती संजय कपूर यांचं निधन झालं. ७ दिवसांनी त्यांचं पार्थिव दिल्लीत आणण्यात आलं. तेव्हा करिश्मा मुलांना घेऊन अंत्यदर्शनासाठी गेली होती. करीना कपूर आणि सैफ अली खानही तिच्यासोबत होते. करीनाही तेव्हा भावुक झालेली दिसली. तसंच वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात सैफ अली खानवर घरातच घुसलेल्या एका व्यक्तीने चाकू हल्ला केला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. म्हणुनच करीनाने पोस्ट शेअर करत भावना मांडल्या आहे. कितीही कठीण प्रसंग असला तरी बहिणी एकमेकींसाठी कायम असतात हे तिने दाखवून दिलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 25-06-2025














