भोस्ते घाटात डंपरची संरक्षण कठड्याला धडक

खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात टाकाऊ वस्तुंची वाहतूक करणारा डंपर रस्त्याच्याकडेला असलेल्या संरक्षण कठड्याला धडकला. या अपघातात डंपर चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच, मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी यांनी तात्काळ रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून भरणा नाका येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 25/Jun/2025