चिपळूण : आषाढी एकादशीच्या मंगलदिनी दिनांक ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठल मंदिर वडाळा येथे ‘ विठ्ठल हरी विठ्ठल’ हा अभंग भक्ती गीतांचा सुरेल कार्यक्रम मंडळाने आयोजित केला आहे.
सकाळचे वातावरण संगीतमय व्हावे आणि भक्तीरसात सर्व भक्त न्हाऊन जावेत यासाठी मंडळाने हा प्रयत्न केला आहे.
पंढरपूरच्या पांडुरंगाचा चरणी लीन होण्यासाठी पाऊले चालती पंढरीची वाट अशी भक्तांची ओढ असते. आषाढी एकादशीचा दिवस महत्वपूर्ण असतो. याच दिवशी विठ्ठल मंदिर वडाळा या मंडळाने गौरी इव्हेंट प्रस्तुत विठ्ठल हरी विठ्ठल हा अभंग व भक्तिरसाचा कार्यक्रम गौरी संगीत विद्यालय वडाळा या संस्थेचे संस्थापक अनिल तुकाराम गावडे यांच्या माध्यमातून सादर होणार आहे. या सुमधुर मैफिलीला मधुर स्वरांची साथ देण्यासाठी विनोद गवंडे, प्रथमेश कुल्ये, सचिन मुजुमदार, प्रशांत जाधव, कल्पना संतोष हे देणार आहेत. त्याचबरोबर वादक म्हणून सुरेश वीर, सतीश मोहिते , राकेश अदावडे, आशिष पवार, संतोष बापर्डेकर, देवयानी मोहळ वादनाची साथ देणार आहेत.
या कार्यक्रमाला अनेक विठ्ठल भक्त उपस्थित राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 25-06-2025














