खेड : १७० पूरग्रस्त दुकानांचे महसूलकडून पंचनामे

खेड : जगबुडीच्या पुराचे पाणी मुख्य बाजारपेठेसह घरांमध्ये १९ जून रोजी घुसून ५ तास पूरस्थिती कायम राहिली होती. या पूरस्थितीत तब्बल १७० दुकानांना फटका बसला असून येथील महसूलकडून पंचनामेही करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली.

बाजारपेठतील कोलमडलेले व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. काही व्यापारी अजूनही दुकानांच्या दुरुस्ती कामात गुंतले आहेत. दुकानांसह घरांचे पंचनामे झाले असले तरी नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. एक-दोन दिवसात बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 25/Jun/2025