गोळपचे पोलिस पाटील निलेश भाटकर ‘भाकर मित्र’ पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : येथील गोळप गावचे गेली १८ वर्षे पोलिस पाटील पदावर काम करणारे निलेश भाटकर यांना भाकर (भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था) या संस्थेतर्फे ‘भाकर मित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्री.भाटकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथील पी एस आय पवन कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर गोगटे कॉलेज चे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. ए. सरतापे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

या सोहळ्याला भाकर संस्थेच्या अध्यक्षा मंगल पोवार, संस्थापक देवेंद्र पाटील त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:12 15-10-2024