चिपळूण : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वालोटी नं.१ येथे वालोटी गावातील पुणे या ठिकाणी स्थायिक असलेले दिपक आंबेडे, शिवाजी आंबेडे, निलेश आंबेडे,अनंत आदवडे, दत्तात्रय आंबेडे, ज्ञानेश्वर कदम, सुरेंद्र पाटेकर, राहुल पाटेकर, दिपक कदम, रामचंद्र कदम, प्रकाश कदम, प्रतिभा तुपे, रामचंद्र येद्रे, सचिन वाघोले, नामदेव गोटल व सचिन आदवडे साठे सोपान श्रीम.प्रतिभा भाऊसाहेब, राकेश मिश्रा, व तोरणा राजगड परिसर समाजोन्नती पुणे यांच्या माध्यमातून शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रति विद्यार्थी अर्धा डझन वह्या, दुरेघी, चार रेघी, चौकट वही, कंपास पेटी,पेन, रंगीत खडू बॉक्स, पेन्सिल बॉक्स पाट्या, चित्रकला वह्या, हासुरे इंग्लिश बुक, स्केच पेन, वॉटर कलर इत्यादी भरघोस शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पार्टी व पेन्सिल इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले. गेली सलग चार वर्षे उदात्त भावनेतून वालोटी गावातील पुणेकर मंडळी, ग्रामस्थ व त्यांचे मित्र मंडळी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. तसेच शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी शाळेला आवश्यक असणारा संपूर्ण स्पीकर सेट शिवाजी आंबेडे व निलेश आंबेडे यांनी प्रदान केला. शालेय विद्यार्थ्यांची वर्गातील खेळांची गरज ओळखून राकेश मिश्रा यांनी शाळेला तीन कॅरम बोर्ड सेट प्रदान केले. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची गरज ओळखून दिपक आंबेडे यांच्या प्रेरणेतून तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास, पुणे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप केले. तसेच पुणेकर मंडळी यांनी रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षा मध्ये यश संपादन केलेले वालोटी नं.१ शाळेचे माजी विद्यार्थी मयुरेश दिपक कदम व निधी विलास धुमक तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघातून खेळणारी वालोटी नं.१ शाळेची माजी विद्यार्थीनी श्रुती श्रीकांत आरवट या विद्यार्थ्यांचा शिल्ड, प्रशस्तीपत्रक व पुष्प देऊन यथोचित सन्मान केला.
सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आराध्या कदम, उपसरपंच व स्थानिक प्राधिकरण सदस्य सचिनजी बामणे साहेब,दिक्षा कदम, प्रज्ञा कांगणे, प्रिया हळदणकर आदी उपस्थित होते. शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा तसेच शाळेच्या गरजा पूर्ततेसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन पुणेकर मंडळींनी दिले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष कादवडकर गुरुजी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कुरणे गुरुजी यांनी केले कार्यक्रमाचं मनोगत पदवीधर शिक्षक लक्ष्मण मते यांनी व्यक्त केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 25-06-2025














