रत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून गोरगरीब लाभार्थ्यांसाठी १,५१५ घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. या घरकुलांच्या कामासाठी रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. घरकुलासाठी पाया खोदणे आणि इतर मजुरीची कामे करण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना रोहयोतून आर्थिक मदत देण्यात येत आहे.
शासनाच्या घरकुल योजनेतून जिल्ह्यात घरे दिली जात आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही योजना ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गावातच काम मिळावे, यासाठी राबविण्यात येत आहे. घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या मजुरीच्या कामासाठी घराचा पाया खोदणे भिंती उभारण्यासाठी चिरा किंवा वीट लावणे आणि इतर मजुरीची कामे करण्यासाठी रोहयोतून मदत देण्यात येत आहे.
घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने रक्कम देण्यात येते. सुरुवातीला पहिल्या हप्त्यासाठी १५ हजार रुपये, दोन महिन्यांनंतर दुसरा हप्त्याची ४५ हजार रुपये, घरकुलाचे काम पूर्ण झाल्यावर तिसऱ्या हप्त्याचे ४० हजार रुपये तर रोजगार हमी योजनेचे २३ हजार रुपये असे एकूण १ लाख ४३ हजार रुपये मिळतात. त्यामुळे घरकुलाच्या लाभासह बांधकाम करण्यासाठी मजुरीचे कामही लाभार्थ्यांनाच मिळत आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळत असल्याने दिलासा मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 25/Jun/2025














