चिपळूण : मराठी साहित्यात सर्वात जास्त योगदान जर कुठल्या भागातून दिले गेले असेल तर ते कोकणातूनच. आजही मराठी साहित्यात मोठ्या संख्येने कोकणातीलच साहित्यिक आहेत. कोकणची भूमी म्हणजे सकस लिहिणाऱ्या लेखकांची गंगोत्री आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुहास बारटक्के यांनी केले.
चिपळूण येथे मराठी साहित्य कला संस्कृती संवर्धन मंडळाची (संपूर्ण कोकण विभाग) स्थापना करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. कोकण विभागाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक सुहास बारटक्के आणि संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य हनुमंत कुबडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. विश्वस्त अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका संगीता लोटे आणि संपूर्ण कोकण प्रमुख प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुचेकर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी, सचिव शंकरराव घोरपडे व प्रमुख विश्वस्त गणेश दिघे उपस्थित होते.
कोकण कार्यकारिणीचे पदाधिकारी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. कांचन मदार, वुमन सपोर्टच्या डॉ. शमीना परकार, लायन्स क्लबचे अध्यक्ष रवीना गुजर, सामाजिक मंजू जंगम, शुभांगी पांढरपट्टे, अंजली चव्हाण उद्योगजिका, डॉ. श्रुतिका कोतकुंडे उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 15/Oct/2024









