खेड : पूरस्थितीत मदतीसाठी बचाव पथकांची नियुक्ती

खेड : पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढून मदतीचा हात देण्यासाठी येथील नगर परिषदेने बचाव पथकांची नियुक्ती केली आहे. या बचाव पथकात नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी तसेच बोट चालकांसह जीवरक्षकांचा समावेश आहे. पूरस्थितीदरम्यान घरांसह दुकानांमध्ये कोणी अडकले असल्यास या बचाव पथकांकडून तातडीने मदतीचा हात दिला जाणार आहे.

मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेतील आपती व्यवस्थापन पावसाळयात २४ तास कार्यरत राहणार आहे. बचाव पथकात बाजारपेठ, गांधीचौक, साठे मोहल्ला, पोत्रिक मोहल्ल्यातगतच्या मार्गाचा समावेश आहे. येथे नोडल अधिकारी मागून नागेश बोंडले, सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून दीपक देवळेकर, बोट चालक साईराज खेडेकर, निखिल चौधरी तर जीवरक्षकांमध्ये संतोष शिंदे, साहिल बुटाला, आयुष मुद्राचे, सर्फराज पांगारकर, सुरज शिगवण यांचा समावेश आहे.

पोलीस स्थानक बचाव पथकात खांबतळे ब्राह्मण आळी, कासार आळी, नगर परिषद परिसर, नाना-नानी पार्क परिसर व इतर भाग समाविष्ट असून नोडल अधिकारी म्हणून प्रणय सस्ते, सहाय्यक नौहल अधिकारी म्हणून स्याम देवळेकर, बोट चालक साईराज साळवी, विक्रांत पाटील, तर जीवरक्षक मागून योगेश शिगवण, सागर आंजरलेकर, बासित सुर्वे, आसिफ जुईकर विपुल बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रपाल मंदिर बचाव पथकात भुवडवाडी, पदुमलेवाडी, कुंभारवाडा, योगिता दंत महाविद्यालय परिसर व लगतचा इतर भाग समाविष्ट आहे.

नोडल अधीकारी म्हणून अक्षय लोहार तर सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून राजेश खेडेकर, बोट चालक सुशांतमहाडिक, प्रणय रसाळ तर जीवरक्षक शुक्लेश काते, अरविंद सावंत, स्वप्रिल जाधव, जयेश पवार, राजेश खेडेकर यांचा समावेश आहे. राखीव अग्निशमक इमारत रेस्क्यू स्थानकात बोट चालक व जीवरक्षक महणून प्रनयय पाग, अफजल पांगारकर, महम्मद पांगारकर, मतीन कावलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अल सफा वेल्फेअर फाऊंडेशनची खासगी बोट साठे पोत्रिक मोहल्ला येथे तैनात असणार आहे. सोनार आळी मित्रमंडळ, कुंभारवाडा दापोली नाका यांच्या बोटीचाही समावेश आहे. येथे नोडल अधिकारी म्हणून आरिफ मुल्लाजी, बिलाल जुईकर, खलिल जुईकर, उदय गुहागरकर, नरेश मालवणकर लक्ष ठेवतील.

अल सफा वेल्फेअर फाऊंडेशनची खासगी बोट साठे पोत्रिक मोहल्ला येथे तैनात असणार आहे. सोनार आळी मित्रमंडळ, कुंभारवाडा दापोली नाका यांच्या बोटीचाही समावेश आहे. येथे नोडल अधिकारी म्हणून आरिफ मुल्लाजी, बिलाल जुईकर, खलिल जुईकर, उदय गुहागरकर, नरेश मालवणकर लक्ष ठेवतील.

न.प. कडून जीवरक्षकांना परिपूर्ण विमा सुरक्षा
आपती काळात जीवाची पर्वा न करता मदतीसाठी सक्रिय राहणाया जीवरक्षकांना खासगी कंपनीकडून परिपूर्ण विमा सुरक्षाही देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आल्याचे खेड नगर परिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 25/Jun/2025