‘रनप’ विद्युत अभियंता धनंजय चव्हाण यांची गडहिंग्लज नगर परिषदेत बदली

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या आणखी एका अधिकाऱ्याची बदली झाली. विद्युत विभागाचे अभियंता धनंजय चव्हाण यांची गडहिंग्लज नगर परिषदेत बदली झाली आहे.

यापूर्वी तीन अधिकाऱ्यांची बदली झाली असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी नवीन कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये आधीच कर्मचारी, अधिकारी वर्ग कमी आहे. अशा परिस्थितीत रनपतील महिनाभरात चार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने इतर अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपवला जात आहे.

विद्युत विभागाचे अभियंता धनंजय चव्हाण यांची गडहिंग्लज नगर परिषदेत बदली झाली आहे. यापूर्वी पाणी विभागाचे अभियंता अविनाश भोईर यांची खोपोली नगर परिषदेत, उपमुख्य अधिकारी प्रविण माने यांची चिपळूण नगर परिषदेत आणि मालमत्ता विभागाचे अधिकारी नंदकुमार पाटील यांची गडहिंग्लज नगर परिषदेत बदली झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:24 15-10-2024