भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही : बच्चू कडू

Bacchu Kadu : एकही ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही? असा सवाल करत ही छुपी आणीबाणीच असल्याचे मत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केले. ती आणीबीणीची फिजीकली तारीख होती, तुमची छुपी आणीबाणी असल्याचे कडू म्हणाले.

ते आमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आणीबाणीचं (Emergency) समर्थन आम्ही करत नाही. पण ज्यांनी आणीबीणीवर लेख लिहला त्यांना मला सांगायचं आहे की, सौ चुहे खाके बिल्ली हजको जाती है तो ये गलत है असे म्हणत बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

भाजपला आणीबाणीवर बोलायचा कोणताही अधिकार नाही. तो त्यांनी गमावला आहे. भाजपची आणीबाणी छुपी आहे, ती निषेधार्ह असल्याचे कडू म्हणाले. तसेच एकही ईडीची कारवाई भाजपच्या माणसावर का झाली नाही? असा सवाल करत कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 25-06-2025