भारतीय रेल्वेकडून सध्या एखादी एक्स्प्रेस निघण्यापूर्वी चार तास अगोदर आरक्षण चार्ट तयार केला जातो. रेल्वेचं तिकीट कन्फर्म झालं की नाही ते 4 तास अगोदर समजतं. आता या नियमामध्ये बदल केला जाणार आहे.
आता रेल्वेकडून आरक्षण चार्ट 24 तास अगोदर तयार केला जाणार आहे. त्यामुळं तुमचं तिकीट वेटिंगवर असेल तर अखेरपर्यंत तिकीट कन्फर्म झाले की नाही याची वाट पाहण्याची गरज राहणार नाही.
नव्या पद्धतीत प्रवाशांना त्यांचं तिकीट कन्फर्म झालं की नाही याची माहिती 24 तास अगोदर समजेल.यामुळं तिकीट कन्फर्म न झाल्यास ते रद्द करुन पर्यायी व्यवस्था करा येऊ शकते. तिकिट रद्द करुन रिफंडची प्रक्रिया सुरु करता येईल.
रेल्वेच्या सध्याच्या नियमानुसार ट्रेन सुटण्यापूर्वी 48 ते 12 तासांच्या काळात तिकीट रद्द केल्यास 25 टक्के रक्कम कपात केली जाते. ट्रेन निघण्यापूर्वी 12 ते 4 तास तिकीट रद्द केल्यास अधिक रक्कम कापली जाते.
ट्रेनचा आरक्षण चार्ट तयार केल्यानंतर तिकीट रद्द केल्यास रिफंड मिळत नाहीत. नव्या नियमानंतर तिकीट रद्द करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेळ मिळेल. प्रवासी त्यांच्या प्रवासासाठी वेगळी व्यवस्था करु शकतात.
सध्या 24 तास आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया केवळ एका स्टेशनवर प्रायोगिक पातळीवर सुरु करण्यात आली आहे.हे यशस्वी झाल्यास रेल्वेला रिफंड धोरणात बदल करावा लागेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:22 25-06-2025














