रत्नागिरी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाचा कार्यालयीन उपयोग विषयावर कार्यशाळा रत्नागिरीत आयोजित करण्यात आली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती २६ जून या सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून ही कार्यशाळा गुरुवारी, 26 जून रोजी सकाळी साडेदहा दुपारी एक या वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव येथे होणार आहे.
या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 26-06-2025














